Sunday, September 30, 2007

मलाही वाटलं प्रेम करावं...!


मलाही वाटलं प्रेम करावं,
म्हणुन मी प्रेम केलं.
आता मला सागा प्रेम मी केलं,
मग तिचं काय गेलं.

मलाही वाटलं स्वंप्ण पहावीत,
म्हणुन मी स्वंप्ण पाहिली.
आता मला सागा स्वंप्ण मी पाहिलीत,
मग तिचं काय गेलं.

मलाही वाटलं मी आनंदी रहावं,
म्हणुन मी आनंदी राहू लागलो.
आता मला सागा आनंदी मी राहू लागलो,
मग तिच काय गेलं.

मलाही वाटलं कि मी कविता करावी,
म्हणुन मी कविता केली.
आता मला सागा कविता मी केली,
मग तिचं काय गेलं.

मलाही वाटलं कि खूप झालं आता,
म्हणून मी "sorry" म्हणालो.
आता मला सागा "sorry" मी म्हणालो,
मग तिचं काय गेलं.
- मयुर वाकचौरे

Tuesday, September 25, 2007

आजही मी ...!


आजही मी ...!
आजही मी तसाच आहे
जसा पुर्वी होतो,
पण...,
तुलाच कसा दिसत नाही.


आजही मी तिथेच उभा आहे
जिथे पुर्वी तुझी वाट पाहत उभा असायचो
मग...,
तुलाच कसा गवसत नाही.


आजही तेच अश्रु डोळ्यात आहे
जे पुर्वी माझ्या डोळ्यात असायचे
पण...,
ते पाहुनही तुला कसे काही वाटत नाही.


आजही तुझेच नाव ओठावर आहे
जे पुर्वी नेहमीच ओठात असायचे
पण...,
तुला कसे एकू येत नाही.


तुझी मात्र कमालच आहे
सर्व काही ठाऊक आहे तुला,
मग...,
समोर असुन हा लपनडाव कुणासाठी?

-मयुर वाकचौरे

नुकतीच आमची भेट झाली...!



नुकतीच आमची भेट झाली...!
मनातील शेवटची ईछा पुर्ण झाली
खुप सुदर दिसत होती ती आज
वर्णन तरी करु तिच मी
जे कधी मला जमलच नाही.


आज नेमकी तिने तेच विचारल
मी आज कशी दिसते?
सागु तरी काय आता तिला,
हा विचार करता-करताच वेळ निघुन गेला.


पुन्हा समोर असताना काही बोलू शकलो नाही
तिने आजही तेव्हढा वेळ मला दिलाच नाही
नतर खुप काही सुचल,
पण एकायला ती मात्र थाबलीच नाही


करु तरी काय माझ्या या मनाला?
मन आता मात्र त्रास देऊ लागले
सारख समोर तीला घेऊन आठवू लागले
पुन्हा जुण्या आठवणी आठवून,
ते ढसा-ढसा रडू लागले


विसरलो होतो तूला,
मग का भेट्लीस मला.
आता तूच साग,
कस समजाऊ माझ्या वेड्या मनाला?


तु नसताना कसे पाहु एकट्याला
तु नसताना कसे समजाऊ या मनाला
आता तरी नको जाऊस दुर
मझ्यासाठी नव्हे, माझ्या मनासाठी तरी,
समजव तुझ्या कठोर मनाला.

- मयुर वाकचौरे