Wednesday, January 30, 2008

निःशब्द...


निःशब्द...
शब्दाच्या या खेळात
डाव माडंला मी मनाचा
सागंत राहिलो शब्दातुनी तूला
भाव या प्रितीचा...!
कधी न कळली प्रित तूला
माझ्या खट्याळ शब्दाची
स्वप्ण फ़क्त एव्हढेची होते
प्रित असू दे कोवळ्या मनाची...!
शब्दातही तूला पाहत होतो
पाहून शब्दातच तूला माडंत होतो
खेळूनी खेळ शब्दाचा
पुन: शब्दातच मी राहत होतो...!
शब्दाच्या या कोड्यात
एक घरटं बाधून पाहीलं मी
घरटं बाधल्यावर मात्र
शब्दातुनीच दुर जाताना तुला पाहिलं...!
शब्दातुनी दुर गेल्यापरी तू
आज निःशब्द होऊनी बसलो
तुझ्या पाठमो-या शरीराकडे बघून
मीच माझ्या शब्दातुनी हसलो...!
तू गेल्यावर आता उरला
तो फक्त ...
निःशब्द.. निःशब्द.. आणि निःशब्द..!
-मयुर वाकचौरे

Wednesday, January 23, 2008

अशी असावी ती...


अशी असावी ती...
स्वपनातील परीसारखी
पण नको स्वनासारखी...
सकाळी तुरळ्क आठवणारी.

अशी असावी ती...
गुलाबाच्या पाकळीसारखी
पण नको गुलाबासारखी...
ऊन्हात कोमजून जाणरी.

अशी असावी ती...
सुर्याच्या कोवळ्या किरणासारखी
पण नको तापलेल्या सुर्यासारखी...
जवळ जाताच राख करणारी.

अशी असावी ती...
चंद्राच्या शितल छायेसारखी
पण नको चंद्रासारखी...
एकही डाग असलेली.

-मयुर वाकचौरे

Wednesday, January 16, 2008

आता तुला सगळं जुनं....?



आता तुला सगळं जुनं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?


मला आठवतं तुझ्या
गालावर पडणारी खळी...
तुला मात्र तुझं हसणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?


मला आठवतं तुझे
ते तिखट अश्रू...
तुला मात्र तुझं रडणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?


मला आठवतं आपण
एकदा पावसात भिजलो होतो...
तुला मात्र तो पाऊस
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?


मला आठवतं दिलं होतं
गुलाबाचं फ़ुल...
तुला मात्र त्याचा रंग
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?


मला आठवतं तु
एकदा रुसली होतीस...
तुला मात्र माझं रागवणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?


मला आठवतं आपण
खुप भाडायचो...
तुला मात्र माझं भाडंण
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?


आता तुला सगळं जुनं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?


-मयुर वाकचौरे