Wednesday, August 11, 2010

Please help the poor Farmer in INDIA.....

If u could do something for them then i would think that my poem got the meaning.....

मातीचं लेकरू

मातीचं लेकरू, मातीत जन्मलं
मातीत वाढून, मातीतच खेळू लागलं
मातीला नवं अस्तित्व देऊन,
मातीतच पोट भरू लागलं......

ठाव नव्हती या लेकराला,
तडा पडेल उभ्या आयुष्याला
गुन्हा फक्त एकच केला,
माती माय समजून, मातीतच जगत राहिला.

न हाव होती पैशाची,
न हाव होती मोठं व्हायची
इच्छा फक्त एवढेची होती ......
सोनं करून मातीचं, सगळ्यांची भूक भागवायची होती.

उभ आयुष्य मातीत झटत राहिला
तहान, भूक, घराला विसरून
उन्हात मर, मर, मरत राहिला
मातीचं लेकरू,
मातीतच पोट भरू लागलं......

हट्ट काय रे या लेकराचा
भूक काय रे या लेकराची
समजू नाही शकलो आपण कधी
जीवन गाथा या मातीच्या लेकराची....

- मयुर वाकचौरे

Monday, August 2, 2010

मला माफ कर आई .....


मला माफ कर आई .....

मला माफ करशील ना आई
आपल्याच घरातील दुधाची ,
चोरून खातोय मी साई.

मला मारताना, नेहमीच तुझ्या डोळ्यात पाणी येई
मला मात्र खोडया करताना नेहमीच हसू येई

किती गं माझा लाड करतेस
माझ्या खोडकर हट्ट पुरविण्याकरता
नेहमीच बाबांपुढे हात पसरतेस....

आजारी मी असताना रात्र-रात्र तू जागतेस
मला खाऊ-पिऊ घालून,
स्वतः मात्र उपाशीच झोपतेस.
मला माफ कर आई .....
मला माफ कर....

सारं काम करून रोज मला शाळेत सोडतेस
दिवसभर अबाड काम करून,
संध्याकाळी मात्र बाबांचे बोलणे खातेस.....

माझ्यासाठी देवाकडे नको-नको ते नवस करतेस
स्वतःला मात्र देवाकडे गहाण ठेऊन ,
माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतेस.
मला माफ कर आई .....
मला माफ कर....

पहिलं पाउल टाकताना ,
बोट पकडून तू मला सावरलं
बळ पायात आल्यावर मात्र,
तुला कधीच मी हरवलं.....

गरम-गरम मला खाऊ घालताना
हात नेहमीच तुझे भाजले,
त्याच हातांना मलम लावायला
स्थान मी माझे गमावले.
मला माफ कर आई .....
मला माफ कर...

आज, थकलेलं तुझं पाऊल पुढे टाकतांना
तुला गरज माझी भासली,
मात्र, पाठ आज मी तुला दाखवली....

अश्रू तुझ्या डोळ्यात
नेहमीच माझ्यासाठी दाटते
दूर मी खूप गेलो,
तरी वाट तू माझी पाहते..
मला माफ कर आई .....
मला माफ कर....

डोळ्यातील पाणी आटलं तुझ्या
आठवण माझी काढत.
तरी, "बाळा चुकलं का रे माझं काही "
श्वास सोडलास तू शेवटी असं म्हणत...
मला माफ कर आई .....
मला माफ कर....
- मयुर वाकचौरे