Wednesday, December 5, 2007

शब्दातुनी आठवण तुझीच आहे...!


करतो आहे कविता आज मी
तुझेच सगळे प्रेम आहे
सुचली जरी ओळ मला
शब्दातुनी आठवण तुझीच आहे

न ठाव मला कवितेची
ओळख शब्दाची तु करुन दिलीस
कधी न ओळखले मी मला
ओळख इतकी तु करुन दिलीस

आठवण तुझी मनी इतकी जपली
दुर तु जरी असली तरी
जवळ असल्याची मनाने समजूत दिली
गोड, गुलाबी थंडी जशी संध्यापरी

कधी न जावे दूर तु
स्वप्णातही मला कधी न भासे
असेल जरी चंद्र दुर तरी
प्रकाश काय कम पडे

जळत असतो सुर्य जरी
तात्पर्य फ़क्त एव्ह्ढेच आहे
प्रकाश सर्वासी देऊनी तरी
रात्रभर बिचारा एकटाच आहे

रागवू तरी कसे तुला मी
चुक माझ्या समोर आहे
रडवुनी तरी तुला काय
डोळ्यातून पडणारे अश्रु माझेच आहे

हक्क गाजवु कसा माझा मी
ज्या हक्काचा तुला राग आहे
झाल्या जरी तिन्ही सान्जा
मनी दिवा तुझा लावला आहे.

समजेल का मन हे माझे तुला
प्रवास अजून खूप लाब आहे...

- मयुर वाकचौरे


प्रेम, प्रेम म्हणजे प्रेम असतं...!


Vol :- 1
प्रेम, प्रेम म्हणजे प्रेम असतं
"आकाश" जमिनीशी भिडणं
एव्ह्ड ते कठीण असतं

वाटत जरी सोपं असलं तरी
"पेपर" लिहीण्याइतकं अवघड असतं
प्रेम, प्रेम म्हणजे प्रेम असतं

दुरून दिसणा-या गुलाबासारखंपण,
जवळ गेल्यावर "काटं" असतं
प्रेम, प्रेम म्हणजे प्रेम असतं

चविला जरी साखर असलं
तरी नतंर "ड्याबेटिज" असतं
प्रेम, प्रेम म्हणजे प्रेम असतं

दाद मिळेल इतपर्यतं ठीक
पुढे ते "Public" असतं
प्रेम, प्रेम म्हणजे प्रेम असतं

"Lecture Attend" करवासं वाटलं तरी
"Seminor" देण्याइतकं अवघड असतं
प्रेम, प्रेम म्हणजे प्रेम असतं.......

-मयुर वाकचौरे

Tuesday, December 4, 2007

फ़ुलपाखरु ते...!


कदाचित कविता वाचुन थोडं वेगळं वाटेल ..........
पण येथे फ़ुलपाखरु हि फ़क्त संकल्पना माडली आहे ........
फ़ुलपाखरुच्या जागी "ति" इथे आहे..... "M...R"...


अशाच एका संध्याकाळी
फ़ुलपाखरु ते मज-जवळ आले
येऊन सुदर, स्वछंदी, ऊनाड
कानी माझ्या दु:ख सागुन गेले.


ओळख नाही त्याची नि माझी
पहिल्याच भेटीत इतक्या जवळ आले
मीही मित्र म्हणून दु:ख तुझे आहे ते माझे
सागुनी प्रेमळ स्वप्णी त्यास वचन दिले.


दिवस रात्र झटलो
दु:ख त्याचे दुर करण्यामागे लागलो
माहित होती व्यथा त्याची मला
स्वत:ला विसरुन त्याजवळ जाऊ लागलो


हसत रहवे त्याने सतत
म्हणून स्वत: रडत राहिलो
कळत-नकळत मन माझे त्यासी जुडले
स्वछंदी मन माझे मला सोडुनी गेले.


दिवस तो मग असाच एक
न सागताच आला
फ़ुलपाखरु ते उडुन दूर गेले
आहाकार मनी माजला.


फ़ुलपाखरुच ते, नाही बंधनात कुणाच्या
उगाच मन हे भ्रमात होते
कधी न कुणाचे झाले ते
मन माझे त्याच्या साथ होते.


कधी न ह्रुदयाच्या "बीट" त्या
आज त्यासाठी पडू लागल्या
लळा लाऊनी ते इतके गेले
आठवणी स्वप्णी येऊ लागल्या.


नेहमीच ते माझे-माझे
म्हणत राहिलो
पण त्याचा कधी
मी झालोच नाही....

-मयुर वाकचौरे
"There is no end of this poem......."

मी असाच आहे...!


मी असाच आहे
कसाही असलो तरी
फ़क्त तुझाच आहे


भेटलो नाही कधी तरी
भेट तुझी नि माझी नेहमीच आहे


रागवणं हा तर फ़क्त बहाना आहे
प्रेम वाढविण्याचा हा नविन "Formula" आहे


तुझी आठवण येते,हे तर कारण आहे
वेडे, तुला विनाकारण छळणं, हा तर माझा स्वभाव आहे


गप्प कितीही असलो तरी
मनातुन बडबड फ़क्त तुझीच आहे


कविता जरी माझी असली तरी
शब्द मात्र तुझेच आहे


मी असाच आहे कसाही असलो तरी
फ़क्त तुझाच आहे

- मयुर वाकचौरे

Saturday, November 24, 2007

मला उत्तर कोण देणार...?


भरारी उडू पाहतं मन हे
पण भावनाना सिमा कोण आखणार...?

वाट दुर जाते ही
पण वाटेत साथ कोण देणार...?


स्वप्न तर खुप पहायची आहे
पण त्याआधी सुखाने झोपुन कोण देणार...?

प्रश्न तर खुप आहेत
पण सर्वाची उत्तरे कुठे मिळणार...?

शत्रु तर खुप आहे वाटेत
पण मित्र कधी मिळणार...?

मिळालेल्या सुदंर जिवनाला
अजून सुदंर कसं बनवणार...?

पडलेल्या ह्या सर्व प्रश्नाचे
मला उत्तर कोण देणार...?

- मयुर वाकचौरे

प्रेम केलं कि अंसच होणार...!


प्रेम केलं कि अंसच होणार....
सहवास कमी दुरावा जास्त मिळणार

नको त्या गोष्टीत अडकून...
डोक्याला नेहमी त्रास होणार

घरच्या नजरेतून वाचून...
समाजाच्या नजरेत नेहमी सापडणार

सुखाच्या शोधात जाताना...
दुःखाच्या जंगलात अडकणार

स्वप्नाच्या नव-नविन दुनियेत भटकताना...
झोप मोडणारे अनेक लोक येणार

प्रेम केलं कि अंसच होणार...
जवळ असून मन दूर होणार

भावनाना साक्ष ठेऊन घेतलेल्या...
शपथी, नेहमीच अधु-या राहणार

भावनाचा उद्रेक होऊन...
हाती मोठी चुक लागणार

मरणापरी आठवेल शब्द हे
प्रेम केलं कि अंसच होणार...!


- मयुर वाकचौरे

Monday, November 12, 2007

याला परेम म्हणता व्हयं.....!



वळख व्हवून निट चार दिस झालं नाय
अन ह्या पोरान्ची झोप उडाली
अन काय बुवा...,
तुम्ही याला परेम म्हणता व्हयं.....

ति दोघं एकमेकाकडे बघुन नुसती हसली काय
अन हि पोरं स्वप्न पाहु लागली
अन काय बुवा...,
तुम्ही याला परेम म्हणता व्हयं.....

एक दिस बाहेर फ़िरायला गेली काय
अन हि पोरं कालेज बुडू लागली
अन काय बुवा...,
तुम्ही याला परेम म्हणता व्हयं.....
एकमेकाच्या मिठित बसुन चार शपथी घेतल्या काय
अन हि पोरं आई-बापाला दुमाजू लागली
अन काय बुवा...,
तुम्ही याला परेम म्हणता व्हयं.....

कुनाचं मन नाय दुखवायचं बुवा मला
पण ऊगाच मनात आलय म्हणून लिहिलयं
अन काय बुवा...,
तुम्हाला एव्हडं राग यायचं कारण काय...?

- मयुर वाकचौरे